छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेली घटना पुर्वनियोजित; आमदार संजय शिरसाट यांचा आरोप
Admin

छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेली घटना पुर्वनियोजित; आमदार संजय शिरसाट यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर शहरात काल झालेला राडा हा पुर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केलाय.

सचिन बडे, औरंगाबाद

छत्रपती संभाजीनगर शहरात काल झालेला राडा हा पुर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केलाय. यावेळी संजय शिरसाट यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, अचानक 400-500 तरुण एकाच वेळी तोंडाला रुमाल बांधून कसे काय येऊ शकतात, तसेच हे सर्व 10 मिनिटांत कसे काय होणे शक्य आहे असा प्रश्न देखील आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी खासदार जलील यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर खासदार सांगतात बटन गॅंग यामागे आहे, तर ती बटन गॅंग कोण आहे हे खासदारांनी पोलिसांना सांगितले पाहिजे असेही आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे. या संदर्भात मी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचेही शिरसाट यांनी सांगितलं.

रामनवमीच्याच पार्श्वभूमीवर हा सर्व प्रकार मुद्दामून घडवण्यात आल्याचा आरोप देखील संजय शिरसाठ यांनी केला. तसेच गृहमंत्री आणि सरकार याविषयी गंभीर असून मी कालच गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि ते सर्व या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असे प्रत्युत्तर देखील त्यांनी विरोधकांना दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com