Mhada Lottery : ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी;  म्हाडाकडून 6,200 हून अधिक स्वस्त घर
Mhada Lottery : ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी; म्हाडाकडून 6,200 हून अधिक स्वस्त घरMhada Lottery : ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी; म्हाडाकडून 6,200 हून अधिक स्वस्त घर

Mhada Lottery : ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी; म्हाडाकडून 6,200 हून अधिक स्वस्त घर

ठाणेकरांसाठी म्हाडा लॉटरी: 6,248 स्वस्त घरांची विक्री सुरू, पहिल्या येणाऱ्यास प्राधान्य!
Published by :
Team Lokshahi
Published on

म्हाडाच्या कोकण मंडळाने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-Urban) अंतर्गत ठाण्यातील शिरगाव आणि खोणी येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) असलेल्या 6,248 घरांच्या दरात बदल केला आहे. ही घरे ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

शिरगावमधील 5,236 घरांची किंमत प्रत्येकी 1.43 लाखांनी वाढवून 19.28 लाख करण्यात आली आहे. तर खोणीतील 1,012 घरांची किंमत 1.01 लाखांनी कमी होऊन ती आता 19.11 लाख इतकी ठरविण्यात आली आहे. ही माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल (IAS) यांनी जाहीर केली.

कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकवाड यांनी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. या प्रकारातील घर खरेदीसाठी कोणतीही अंतिम मुदत नाही, घरे विकली जाईपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.

या घरांसाठी अर्ज करताना उत्पन्नाचे निकष पाळावे लागतील. वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असल्यास EWS, 6 ते 9 लाखांदरम्यान असल्यास LIG,9 ते 12 लाखांदरम्यान असल्यास MIG आणि 12 लाखांपेक्षा जास्त असल्यास HIG या गटांत अर्ज करता येईल. दिवाळी 2025 च्या सुमारास सुमारे 5,000 घरांची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता असून, ती मुंबईतील विविध भागांमध्ये उपलब्ध असतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com