The 'Ladki Bahin' scheme awaits increased funding, and the number of beneficiaries is likely to decrease due to KYC requirements.
The 'Ladki Bahin' scheme awaits increased funding, and the number of beneficiaries is likely to decrease due to KYC requirements.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत निधी वाढीची प्रतीक्षा, केवायसीमुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता

अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेतून दरमहा 1500 रुपये थेट खात्यात जमा होतात.
Published by :
Riddhi Vanne
Published on

अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेतून दरमहा 1500 रुपये थेट खात्यात जमा होतात, त्यामुळे अनेक महिलांना मोठा आधार मिळाला. निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी हा निधी वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होऊन बराच काळ लोटला तरी रक्कम वाढलेली नाही. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे.

यातच आता महिलांसमोर नवी अडचण उभी राहण्याची शक्यता आहे. सरकारने केवायसी बंधनकारक केल्यानंतर अनेक लाभार्थी महिलांचे पैसे थांबवण्यात आले. काही जणी अपात्र ठरल्या, तर काही पात्र असूनही त्यांचा हप्ता बंद झाला. यामुळे अनेक ठिकाणी महिलांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनही केले.

आता सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी प्रत्यक्ष तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली असूनही पैसे मिळाले नाहीत, त्यांची पुन्हा चौकशी होणार आहे. पात्र ठरणाऱ्या महिलांना पुन्हा लाभ मिळेल, मात्र अपात्र आढळल्यास कायमचा निधी थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते.

थोडक्यात

  1. अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे.

  2. या योजनेतून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा होतात.

  3. यामुळे अनेक महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे.

  4. निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी या निधीची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते.

  5. सरकार स्थापन होऊन बराच काळ गेला तरी रक्कम वाढलेली नाही.

  6. त्यामुळे महिला आणि लाभार्थींमध्ये 2100 रुपये कधी मिळतील? याची उत्सुकता वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com