काल अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जनास मार्गस्थ झालेल लालबागचा राजा आज सकाळी 7:45 च्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे.
लालबागच्या राजाची 22 तास मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर, लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीवर पोहोचला आणि विसर्जनासाठी सज्ज झाला.
मात्र समुद्राला आलेली भरती आणि नवीन अत्याधुनिक तराफ्याच्या काही तांत्रिक अडचणींमुळे लालबागचा राजाच्या विसर्जनात विलंब निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे लालबागचा राजाचे विसर्जन लांबवणीवर पडले असून त्याऐवजी चिंचपोकळीच्या चिंतामणीला विसर्जनासाठी मार्गस्थ करण्यात आले.
त्यामुळे आता लालबागच्या राजाचे विसर्जन समुद्राची भरती ओसरून ओहोटी सुरु झाल्यानंतर करण्यात येणार आहे.