Happy New Year : 2025 चा शेवटचा सूर्यास्त; नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज शहरं

Happy New Year : 2025 चा शेवटचा सूर्यास्त; नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज शहरं

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जगभरातील लोक सज्ज झाले आहेत. सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. मुंबईतील जुहू चौपाटीवर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

New Year welcome : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जगभरातील लोक सज्ज झाले आहेत. सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. मुंबईतील जुहू चौपाटीवर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी आहे. 2025 वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक इथे एकत्र आले आहेत.

जुहू चौपाटीवर 31 डिसेंबरच्या रात्रीच्या पार्टीसाठी आणि नववर्षाच्या आगमनासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी झाली आहे. मुंबईच्या विविध भागांतून पर्यटक येथे पोहोचले आहेत. पर्यटकांनी इथे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी गर्दी केली आहे. यामुळे, मुंबई पोलिसांनी इथे विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सिविल ड्रेसमध्ये महिला अधिकारीही सुमारे परिसरात गस्त घालणार आहेत.

मरीन ड्राईव्ह परिसरातही 31 डिसेंबरच्या संध्याकाळी मोठ्या संख्येने मुंबईकर आणि पर्यटक दिसत आहेत. या ठिकाणी सूर्यास्ताचा आनंद घेताना पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मरीन ड्राईव्हमध्ये 2025 सालाच्या शेवटच्या सूर्यास्ताचे दृश्य बघण्यासाठी लोक एकत्र येत आहेत. या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील आहे. रात्री मुंबईकरांमध्ये मोठ्या आनंदात सेलिब्रेशन होईल, असे दिसून येते. 31 डिसेंबर 2025 चा शेवटचा दिवस आणि त्यानंतर 2025 चा सूर्योदय होईल.

पालघर परिसरातील समुद्रकिनाऱ्यावरही नववर्षाच्या स्वागतासाठी आणि वर्षाच्या शेवटच्या दिवसाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे. पालघरमधील केळवा, चिंचणी, डहाणू आणि बोर्डी किनाऱ्यावर पर्यटकांची वर्दळ आहे. मुंबई आणि ठाणे शहराच्या जवळ असल्यामुळे लोक पालघरला येऊन समुद्रकिनाऱ्यावर मजा करत आहेत. संध्याकाळी या ठिकाणी पर्यटकांचा जमाव पाहायला मिळाला, आणि त्यांचा उत्साह स्पष्टपणे दिसून आला. सार्वजनिक स्थळांवर पोलिसांचा बंदोबस्त आणि लोकांचा आनंद साजरा करण्याची तयारी जोरात सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com