Super Moon 2025 : 2025 मधील शेवटचा सुपरमून; कुठे, किती वाजता जाणून घ्या सविस्तर

आज गुरुवार, 4 डिसेंबर, श्रीदत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात आकर्षक सुपरमून दिसणार आहे.
Published by :
Riddhi Vanne

(Super Moon 2025) आज गुरुवार, 4 डिसेंबर, श्रीदत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात आकर्षक सुपरमून दिसणार आहे. पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या माहितीनुसार, आज चंद्र पृथ्वीपासून केवळ 3,56,962 किमी अंतरावर येणार असल्याने तो साधारण 14% मोठाआणि 30% अधिक तेजस्वी दिसेल.

सायं. 5:18 वाजताचंद्र उगवेल आणि रात्रभर दिसत राहील. सकाळी 7:14 वाजता तो मावळेल. हा नजारा संपूर्ण भारतातून नग्न डोळ्यांनी पाहता येईल.पुढील सुपरमूनचा योग 24 डिसेंबर 2026 रोजी येणार आहे.

थोडक्यात

  • आज गुरुवार, 4 डिसेंबर, श्रीदत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात आकर्षक सुपरमून दिसणार आहे.

  • पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या माहितीनुसार,

  • आज चंद्र पृथ्वीपासून केवळ 3,56,962 किमी अंतरावर येणार असल्याने तो साधारण 14% मोठाआणि 30% अधिक तेजस्वी दिसेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com