Mumbai Covid Update  : मुंबईत नवीन रुग्णांची वाढ! 43 नवीन रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू

Mumbai Covid Update : मुंबईत नवीन रुग्णांची वाढ! 43 नवीन रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू

मुंबईत रविवारी 43 नवीन कोविड रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. यातच आता कोरोना पुन्हा एकदा आल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. जानेवारीपासून राज्यात एकूण रुग्णांची संख्या 300 झाली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होत असून रविवारी 43 नवीन कोविड रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. या माहितीनुसार मुंबईत एकूण 248 रुग्णांची नोंद झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जानेवारीपासून 7389 चाचण्या केल्या आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 209 होती, तर 87 रुग्ण बरे झाले. तर चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आली आहे.

याचपार्श्वभूमीवर एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, " मृत चार रुग्णांना कॉमोरबिडीटीज होता, त्यापैकी एका रुग्णाला नेफ्रोटिक सिंड्रोमसह हायपोकॅल्सेमियाचे झटके आले होते. तर दुसऱ्या रुग्णाला कर्करोग होता. एवढचं नव्हे तर तिसऱ्या रुग्णाला ब्रेन स्ट्रोक होता आणि चौथ्या रुग्णाला डायबेटिक केटोअ‍ॅसिडोसिस होता". यादरम्यान मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण, पुण्यात 4, कोल्हापूर व रायगड येथे दोन तर ठाणे व लातूर येथे एक असे रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com