MSRTC News : महाराष्ट्रात येणार एसटीच्या Smart Buses! प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि सुसज्ज सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज 'स्मार्ट बसेस' Smart Buses सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. नवीन 'लालपरी' बसांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीवर आधारित आहेत. यामध्ये कॅमेरे, जीपीएस, एलईडी टीव्ही, वाय-फाय, चालकासाठी ब्रेथ अॅनालायझर, तसेच चोरी व गैरप्रवेश टाळण्यासाठी बस लॉक सिस्टीम बसवली जाणार आहे. या सुविधांमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
स्वारगेट बसस्थानकावरील अलीकडील घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे CCTV Camera लावले जातील, जे प्रवासादरम्यान चालकाच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर देखील लक्ष ठेवतील. यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळता येईल.
बसस्थानक व त्याच्या परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बस पूर्णपणे बंद राहतील, यासाठी खास यंत्रणा उभारली जाणार आहे. एलईडी टीव्हीद्वारे महत्त्वाचे संदेश व माहिती प्रत्येक बसमध्ये एलईडी टीव्ही LEDTV बसवणार आहे. त्याद्वारे सरकारी संदेश, महत्त्वाच्या घडामोडी व जाहिराती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. तसेच बसच्या बाहेरील भागावर एलईडी पॅनलद्वारे जाहिरात प्रसिद्धी होणार असून यामुळे महामंडळाला आर्थिक लाभही होणार आहे.
गेल्या काही काळात तापमानवाढीमुळे एसटी बसला आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. यापार्श्वभूमीवर प्रत्येक बसमध्ये फोम बेस अग्निशमन यंत्रणा बसवली जाणार असून, आग लागल्यास ती तत्काळ विझवण्यासाठी ही व्यवस्था कार्यान्वित होईल. ही आधुनिक तंत्रज्ञानयुक्त ‘स्मार्ट बस’ सेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, राज्यभरातील प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि माहितीपूर्ण होणार आहे.