ताज्या बातम्या
Amravati : अमरावतीत महायुतीतील सहभागी पक्षांचा सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्यूला; भाजपचा महापौर तर युवा स्वाभिमान पक्षाचा उमेदवार उपमहापौर होणार
अमरावतीत महायुतीतील सहभागी पक्षांचा सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्यूला ठरल्याची माहिती मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Amravati) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता अमरावतीत महायुतीतील सहभागी पक्षांचा सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्यूला ठरल्याची माहिती मिळत आहे.
अमरावतीत भाजपचाच महापौर होणार असून युवा स्वाभिमान पक्षाचा उमेदवार उपमहापौर होणार आहे. सकाळी 11 वाजता महापौर आणि उपमहापौर पदाची निवड करण्यात येणार असून पालिकेतील सभागृहात सदस्य हात उंचावून मतदान करणार आहेत.
Summary
अमरावतीत भाजपचाच महापौर होणार
युवा स्वाभिमान पक्षाचा उमेदवार उपमहापौर होणार
सकाळी 11 वाजता महापौर आणि उपमहापौर पदाची निवड
