Weather Update : 'या' जिल्ह्यांना पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा.
Weather Update : 'या' जिल्ह्यांना पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा...Weather Update : 'या' जिल्ह्यांना पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा...

Weather Update : 'या' जिल्ह्यांना पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा...

आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

  • आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली

  • 24 ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा, बीड, लातूर, नागपूर आदी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला

नानासाहेब पेशव्यांच्या समाधीच्या दुरुस्तीबाबत महानगरपालिका प्रशासन पुढील काही दिवसांत काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

24 ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा, बीड, लातूर, नागपूर आदी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, जोरदार पावसाचा अंदाज आहे. 25 ऑक्टोबरला सांगली, सोलापूर, धुळे, नंदुरबार, अमरावती, अकोला आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे.

या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील अनेक भागांत सध्या धानाची कापणी आणि कापसाची वेचणी सुरू असून, पाऊस झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. हवामान विभागाने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com