Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, थंडीचा कडाका वाढणार
हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, आणि त्याचा राज्यावर मोठा परिणाम झाला. अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, अनेकांचे घरं पाण्याखाली गेली आणि शेतीचं उत्पादन पूर्णपणे हवालदिल झालं.
आता, हवामान विभागाने पुन्हा एकदा तातडीचा इशारा जारी केला आहे. दक्षिण भारताच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत एक सायक्लॉनिक सर्कुलेशन तयार होणार असून, त्याचा परिणाम काही राज्यांवर होईल. या वातावरणीय परिस्थितीमुळे 19 ते 25 नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा इशारा आहे. यामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उत्तर आणि मध्य भारतात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये थंडीच्या लाटेची सूचना देण्यात आली आहे. महाराष्ट्रात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात एकाच वेळी पावसाचे संकट आणि थंडीचा जोर वाढणार असल्याने लोकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

