Chhath Pooja 2025 : मुंबईत ६० ठिकाणी पूजा, भाविकांसाठी महापालिकेच्या 'या' विशेष सोयी
Chhath Pooja 2025 : मुंबईत ६० ठिकाणी पूजा, भाविकांसाठी महापालिकेच्या 'या' विशेष सोयी Chhath Pooja 2025 : मुंबईत ६० ठिकाणी पूजा, भाविकांसाठी महापालिकेच्या 'या' विशेष सोयी

Chhath Pooja 2025 : मुंबईत ६० ठिकाणी पूजा, भाविकांसाठी महापालिकेच्या 'या' विशेष सोयी

मुंबई व उपनगर भागात राहणाऱ्या उत्तर भारतीय बांधवांमुळे छटपूजा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आज आणि उद्या होणाऱ्या छटपूजेसाठी मुंबई महापालिका पुर्णपणे सज्ज झाली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • मुंबई व उपनगर भागात राहणाऱ्या उत्तर भारतीय बांधवांमुळे छटपूजा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

  • आज आणि उद्या होणाऱ्या छटपूजेसाठी मुंबई महापालिका पुर्णपणे सज्ज झाली आहे.

  • पूजा स्थळांवरील सर्व सुविधा नीट कार्यरत आहेत का, याची पाहणी नेतेमंडळी करतील.

मुंबई व उपनगर भागात राहणाऱ्या उत्तर भारतीय बांधवांमुळे छटपूजा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आज आणि उद्या होणाऱ्या छटपूजेसाठी मुंबई महापालिका पुर्णपणे सज्ज झाली आहे. मुंबईत सुमारे ६० ठिकाणी छटपूजा आयोजित करण्यात आली असून, भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रकाशव्यवस्था, शौचालये, कपडे बदलण्यासाठी खोल्या, टेबल्स आणि वाहतूक नियंत्रणाची सोय करण्यात आली आहे. पूजा स्थळांवरील सर्व सुविधा नीट कार्यरत आहेत का, याची पाहणी नेतेमंडळी करतील. तसेच शहर आणि उपनगरात एकूण १४८ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

यापूर्वी मंत्री लोढा आणि अमित साटम यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात पूर्वतयारी बैठक घेण्यात आली होती. त्यात ५५ पूजा समित्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. समित्यांच्या सूचनांनुसार त्वरित कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. उत्सव काळात भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो व बेस्ट सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू राहतील.

तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईकर आणि उत्तर भारतीय बांधवांसाठी छटपूजेचा हा उत्सव आनंददायी आणि सुरक्षित पार पडावा, यासाठी प्रशासन सज्ज आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com