IND vs ENG: तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे उद्घाटन ,
IND vs ENG: तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे उद्घाटन ,IND vs ENG: तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे उद्घाटन ,

IND vs ENG: तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे उद्घाटन , मालिका जिंकणाऱ्या कर्णधाराला मिळणार 'पतौडी पदक'

क्रिकेट इतिहासात नवा अध्याय, तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे उद्घाटन, विजेत्याला पतौडी पदक.
Published by :
Team Lokshahi
Published on

क्रिकेट विश्वात cricket world भारतासाठी एक गौरवशाली घटना घडली आहे. "पतौडी ट्रॉफी" "Pataudi Trophy" चे नाव बदलून आता "अँडरसन-तेंडुलकर" "Anderson-Tendulkar" असे ट्रॉफी ठेवण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड India and England यांच्यामधील कसोटी मालिकेमध्ये जो संघ विजयी ठरेल, त्या संघाला ही ट्रॉफी Trophy दिली जाणार आहे. सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar आणि जेम्स अँडरसन James Anderson यांच्या नावाने यांच्या नावाने ही ट्रॉफी दिली जाणार असल्याने भारतासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

भारताचा सर्वोत्कृष्ट महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या हस्ते या नव्या ट्रॉफीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इंग्लंडचा माजी गोलंदाज जेम्स अँडरसन आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर हे दोघे उपस्थित होते. याआधी या ट्रॉफीचं नाव "पतौडी ट्रॉफी" असे होते. पण आता या ट्रॉफीचे नाव अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे करण्यात आले आहे. या ट्रॉफीच्या डिझाईनमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहे. ट्रॉफीवरती तेंडुलकरचा आयकॉनिक कव्हर ड्राईव्ह आणि ऍड्रेसचा सिग्नेचर बॉलिंग ॲक्शन यांच्यासह दोघांच्या स्वाक्षरी सुद्धा आहेत. बीसीसीआय आणि ईसीबी ( इंग्लंड अ‍ॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्ड) या दोघांच्या एकत्रित निर्णयाने या ट्रॉफीची निर्मिती करण्यात आलेली आहे.

वयाच्या 21 व्या वर्षी पतौडी सर्वात तरुण भारतीय कसोटी कर्णधार बनले. त्यांच्या सन्मानार्थ 1932 मध्ये भारताच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 2007 मध्ये पतौडी ट्रॉफीचे उदघाटन करण्यात आले होते. तिचे नाव इफ्तिखार अली खान पतौडी आणि त्यांचा मुलगा मन्सूर अली खान पतौडी यांच्या नावरून ठेवण्यात आले होते. तथापि, आता त्याचे नाव तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे. दरम्यान तरी सुद्धा पतौडी कुटुंबाचा वारसा कायम राखण्यासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यामधील कसोटी मालिकेमध्ये जो संघ विजयी होईल, त्या संघाच्या कप्तानाला पतौडी सरांच्या नावे "पतौडी मेडल" देण्यात येणार आहे.

या ट्रॉफी उदघाटन प्रसंगी जेम्स अँडरसन म्हणाला की, "हा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनातील अत्यंत अभिमानस्पद प्रसंग आहे. आणि मला यामुळे खूप आनंद झाला आहे. सचिन तेंडुलकर म्हणाला,"माझ्यासाठी कसोटी क्रिकेट हे जीवनाचे एक प्रतीक आहे. हा खेळाचा सर्वोच्च प्रकार आहे. या मध्ये तुम्ही तुमचा बेस्ट देत असता आणि यात काही चूक झाली तर तुम्हाला यावर चर्चा करण्यासाठी वेळ ही मिळतो . या ट्रॉफी साठी माझ्या नावाची निवड झाली ही खूप आनंदाची गोष्ट आहे" सध्या भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर असून या मालिकेतील पहिली कसोटी 20 जूनपासून लीड्समध्ये खेळवली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com