रेडिसन ब्लू हॉटेलच्या मालकाची आत्महत्या

रेडिसन ब्लू हॉटेलच्या मालकाची आत्महत्या

रेडिसन ब्लूचे मालक अमित जैन यांनी शनिवारी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे

मुंबई : रेडिसन ब्लूचे मालक अमित जैन यांनी शनिवारी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. यामुळे हॉटेल विश्वात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मृतदेह ताब्यात घेतला आहे.

 रेडिसन ब्लू हॉटेलच्या मालकाची आत्महत्या
शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात विरोधकांनी फोडले फटाके; राहुल गांधी संतापले

माहितीनुसार, अमित जैन यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अमित जैन यांना पदपरगंज येथील मॅक्स रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या आत्महत्येमागे व्यवसायातील मोठे नुकसान असल्याचे सांगण्यात येत आहे. कौटुंबिक सूत्रे अद्याप उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. अमित जैन यांच्या फ्लॅटमधून दिल्ली पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्याच्या घराची आणि वाहनाची झडती घेतली जात आहे.

रेडिसन ब्लू हॉटेल गाझियाबादमधील मेरठ-दिल्ली एक्सप्रेसवेच्या किनारी कौशांबी येथे आहे. पंचतारांकित हॉटेलला लागूनच रेडिसन टॉवर आहे. त्याचे मालक अमित जैन हे बराच काळ आपल्या कुटुंबासह दिल्लीतील खेलगाव येथे एका फ्लॅटमध्ये राहत होते.

 रेडिसन ब्लू हॉटेलच्या मालकाची आत्महत्या
...असे ढोंगी सावरकर भक्तांना का वाटत नाही : संजय राऊत
Lokshahi Marathi
www.lokshahi.com