Raigad : रायगडमधून निघालेली पंढरपुर यात्रा संपन्न; भरत गोगावले, राजू खरेंचा वारकऱ्यांशी संवाद

रायगड जिल्ह्यातून निघालेली पंढरपूर यात्रा नुकतीच भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी भरत गोगावले, राजू खरेंनी यात्रेला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला.
Published by :
Prachi Nate

रायगड जिल्ह्यातून निघालेली पंढरपूर यात्रा नुकतीच भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सुशांत गणेश जाबरे यांच्या विभग फाउंडेशनच्या वतीने आयोजित या यात्रेत, वारकरी परंपरेची झलक, तळमळीची भक्ती आणि सामाजिक एकतेचं दर्शन घडलं. “एकच ध्यास, रायगडचा विकास” हा संदेश वारकऱ्यांच्या रांगेतून प्रबळपणे उमटताना दिसला.

विठोबाच्या दर्शनासाठी रायगडच्या महाड आणि परिसरातून 3 हजारहून अधिक वारकरी सहभागी झाले. त्यानंतर विठुरायाला नैवेद्यरूपाने 5 हजार 100 लाडू अर्पण करण्यात आले. शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे कैबिनेट मंत्री भरत गोगावले, त्यांचे सुपुत्र विकास गोगावले, तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरेंनी यात्रेला प्रत्यक्ष भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com