Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaLadki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणींचा पैसा कुठे अडकला?

उदगीर शहर आणि तालुक्यातील अनेक महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली लाडकी बहीण योजना सध्या अडचणीत सापडली आहे. तपासणीनंतर गेल्या दोन महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने अनेक घरांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Ladki Bahin Yojana: उदगीर शहर आणि तालुक्यातील अनेक महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली लाडकी बहीण योजना सध्या अडचणीत सापडली आहे. तपासणीनंतर गेल्या दोन महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने अनेक घरांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

निवडणूक निकालानंतर जाहीर झालेल्या 2,100 रुपयांच्या वाढीव रकमेची वाट पाहणाऱ्या महिलांमध्ये नाराजी वाढत आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संपल्यानंतर तरी पैसे मिळावेत, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे. या योजनेतील रक्कम महिलांसाठी फक्त मदत नव्हे, तर मुलांचे शिक्षण, औषधे आणि रोजच्या गरजांसाठी आधार होती.

मात्र नोव्हेंबरपासून पैसे खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. केवायसी आणि सर्व कागदपत्रे पूर्ण करूनही लाभ थांबल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. काहींना रक्कम मिळत असली तरी मोठ्या प्रमाणावर महिलांचे हप्ते बंद असल्याचे दिसून येत आहे. याचा थेट परिणाम घरखर्चावर होत आहे.

थोडक्यात

  1. उदगीर शहर आणि तालुक्यातील अनेक महिलांसाठी लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली आहे.

  2. सध्या ही योजना अडचणीत सापडली असून, तपासणीनंतर गेल्या दोन महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने अनेक घरांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

  3. निवडणूक निकालानंतर जाहीर झालेल्या 2,100 रुपयांच्या वाढीव रकमेची वाट पाहणाऱ्या महिलांमध्ये नाराजी वाढली आहे.

  4. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संपल्यानंतरही पैसे मिळावेत, अशी महिलांची अपेक्षा आहे.

  5. या योजनेतील रक्कम महिलांसाठी फक्त मदत नव्हे, तर मुलांचे शिक्षण, औषधे आणि रोजच्या गरजांसाठी आधार होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com