Gold News : सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का

गेले काही दिवस सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीने दीर्घकाळातही बाजारात वर्चस्व गाजवले आहे. यामुळे गुंतवणुकदारांना याचा फायदा होत आहे.
Published by :
Prachi Nate

गेले काही दिवस सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीने दीर्घकाळातही बाजारात वर्चस्व गाजवले आहे. यावर्षी गुंतवणूकदारांना एमसीएक्सवर 30 टक्क्यांपेक्षा जास्त मोबदला दिला आहे. तर चांदीच्या मालमत्तांमध्येही 35 टक्के वाढ झाली आहे. तर निफ्टीमध्ये 50 निर्देशांकात 4.65 टक्के वाढ झाली आहे.

यामुळे गुंतवणुकदारांना याचा फायदा होत आहे. बीएसई सेन्सेक्सने सुमारे 3.75 टक्के परतावा दिला आहे. तसेच एमसीएक्सवरील सोने प्रति 10 ग्रॅम 32 हजार रुपयांवरून 97 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. याचाच अर्थ 200 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com