RBI Repo Rate : सणासुदीच्या काळात मोठा दिलासा! रक्षाबंधनपूर्वी RBI पुन्हा रेपो रेटमध्ये कपाती करण्याची शक्यता; RakshaBandhan 2025

RBI Repo Rate : सणासुदीच्या काळात मोठा दिलासा! रक्षाबंधनपूर्वी RBI पुन्हा रेपो रेटमध्ये कपाती करण्याची शक्यता; RakshaBandhan 2025

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशातील गृहकर्ज आणि वाहन कर्जदारांसाठी भारतीय रिझर्व्ह बँक 4 ते 6 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या मौद्रिक धोरण समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेट कपातीचा निर्णय घेऊ शकते.
Published by :
Team Lokshahi
Published on

(RakshaBandhan2025) रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशातील गृहकर्ज आणि वाहन कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी येऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 4 ते 6 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या मौद्रिक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेट कपातीचा निर्णय घेऊ शकते, असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

अहवालानुसार, आगामी सणासुदीचा हंगाम लवकर सुरू होणार असल्याने कर्जवाढीस चालना देण्यासाठी RBI 25 बेसिस पॉइंट्सनी रेपो दर कपात करण्याची शक्यता आहे. अशा कपातीमुळे कर्ज घेणाऱ्यांना व्याजदरात थेट दिलासा मिळेल. यामुळे ग्राहकांचा खर्चवाढीचा कल दिसून येतो, जो अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा घटक ठरतो.

SBI च्या विश्लेषणानुसार, ऑगस्ट 2017 मध्ये जेव्हा RBI ने 25 बेसिस पॉइंट्सनी रेपो दरात कपात केली होता, त्यानंतर दिवाळीपर्यंत कर्ज वितरणात जवळपास 1.95 लाख कोटी रुपयांची वाढ झाली होती. विशेषतः, यातील सुमारे 30% कर्जे वैयक्तिक वापरासाठी घेतली गेली होती, ज्यामध्ये गृहकर्ज, वैवाहिक खर्च, इलेक्ट्रॉनिक खरेदी यांचा समावेश होता. या कपातींमुळे रेपो दर 6.00% वरून 5.50% पर्यंत खाली आला आहे. याचा थेट परिणाम बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जांवर झाला असून, गृहकर्ज, वाहनकर्ज यांसारख्या उत्पादनांवरील व्याजदर कमी झाले आहेत.

रेपो दर कपात महत्त्वाची का?

रेपो रेट हा तो व्याजदर आहे, ज्यावर RBI बँकांना शॉर्ट टर्म कर्ज देते. जेव्हा रेपो रेट खाली येतो, तेव्हा बँकांचे निधी उधार घेण्याचे खर्च कमी होतात, ज्याचा फायदा ते ग्राहकांना कमी व्याजदराच्या स्वरूपात देतात. परिणामी, आर्थिक व्यवहारात liquidity वाढतो आणि बाजारपेठेत खरेदीचा कल बळावतो. जर RBI ऑगस्टमध्ये अपेक्षित 25 बेसिस पॉइंट्सची कपात करत असेल, तर रक्षाबंधनपूर्वी ग्राहकांसाठी ही एक मोठी आर्थिक आनंदवार्ता ठरू शकते. कर्ज घेणाऱ्यांसाठी स्वस्त व्याजदर उपलब्ध होण्याची शक्यता असून, आगामी सणासुदीच्या कालखंडात क्रेडिट ग्रोथ आणि आर्थिक सक्रियतेला बळकटी मिळू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com