Municipal elections  : भाजप–शिवसेना शिंदे गटात जागावाटपाचा पेच

Municipal elections : भाजप–शिवसेना शिंदे गटात जागावाटपाचा पेच

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 23 डिसेंबरपासून निवडणूक आयोगानं जाहीर
Published on

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 23 डिसेंबरपासून निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर 15 जानेवारी 2025 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे,मतमोजणी 16 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे, राज्यातील काही महत्त्वाच्या महापालिका निवडणुका भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीमध्ये लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिका निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या माहितीनुसार दादर वसंत स्मृती भवन इथे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. भाजपने या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात शिवसेना शिंदे गटाची गोची केल्याची माहिती समोर येत आहे. 227 जागांपैकी निम्म्या जागांवर शिवसेना शिंदे गटाकडून या बैठकीमध्ये दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र दुसरीकडे या बैठकीमध्ये भाजपकडून गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं जिंकलेल्या जागांवरही भाजपकडून दावा करण्याची आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

82 प्रभागांवरील दावा भाजपने 2017 साली जिंकलेल्या कायम ठेवला आहे. याशिवाय, 2017 साली बंडखोरीमुळे पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांना पडलेली मते आणि बंडखोर उमेदवाराला मिळालेली मते तेथील शिवसेनेच्या विजयी उमेदवारापेक्षा जास्त असतील तर त्या जागेवरही भाजपकडून दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना झाल्याने शिवसेना शिंदे गटाने भाजपचा दावा खोडून काढल्याची माहीती आहे. 2014 च्या आधारावर जागा वाटप करणे योग्य नाही. आताच्या जागावाटपासाठी त्यावेळची आकडेवारी योग्य ठरणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं या बैठकीत मांडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दुसरीकडे मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती होणार आहे, तर पुण्यात मात्र भाजप ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे, पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप हे महायुतीमधील दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com