Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आज होणार खुला, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Admin

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आज होणार खुला, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आज खुला होणार
Published by :
Siddhi Naringrekar

समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आज खुला होणार असून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील नाशिकमधील भरवीरपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आज होणार आहे.

शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू झाला आहे.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील डिसेंबर 2022 ला नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शिर्डी ते भरवीर अंतर 40 ते 45 मिनिटांत पार करता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com