Dasara Melava Controversy
Dasara Melava ControversyTeam Lokshahi

शिंदेगटाने केलेला बीकेसी येथील मैदानासाठीचा अर्ज मान्य

दोन्ही गटांकडून बीकेसी येथील मैदानासाठी एमएमआरडीकडे अर्ज करण्यात आले होते.

दसरा मेळाव्यासाठी मैदान आरक्षणावरून शिवसेना आणि शिंदे गटांमध्ये रस्सीखेच सुरू असताना शिवसेनेला आता मोठा धक्का बसला आहे. शिवाजी पार्क मैदानासाठी महापालिकेकडून कायदा व सुरक्षेचे कारण पुढे करत अद्याप दोन्ही गटाला परवानगी देण्यात आलेली नाही.

Dasara Melava Controversy
ढोल-ताशा, झेंडे अन् हजारोंची गर्दी; राज ठाकरे नागपुरात दाखल... वाचा कसा असेल विदर्भ दौरा?

शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगी न दिल्यानं दसरा मेळाव्यासाठी पर्यायी मैदान म्हणून दोन्ही गटांकडून बीकेसी येथील मैदानासाठी एमएमआरडीकडे अर्ज करण्यात आले होते. मात्र एमएमआरडीएने शिंदे गटाने अर्ज केलेल्या मैदानासाठी परवानगी देताना उद्धव ठाकरे गटाचा परवानगी अर्ज फेटाळला आहे. याउलट शिवसेनाही आता शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क मैदानावरच दसरा मेळावा घेण्यावर ठाम झाली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्या वरून आता मुंबईत मोठे रामायण होण्याची शक्यता आहे.

Lokshahi
www.lokshahi.com