Navi MumbaiNavi Mumbai
ताज्या बातम्या
Navi Mumbai : खारघर टेकडीवर बिबट्याचा पुन्हा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
खारघर टेकडीवरील चाफेवाडी पाडा परिसरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(Navi Mumbai) खारघर टेकडीवरील चाफेवाडी पाडा परिसरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दाट झालेल्या झाडझुडपांमुळे आणि वाढत्या बांधकामांमुळे वन्यप्राणी टेकड्याकडे वळत असल्याची चर्चा आहे. चार महिन्यांपूर्वीही याच भागात बिबट्या पाहिला गेला होता. ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने सापळे लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार जागेची पुन्हा तपासणी केली जाईल, असे वन अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
थोडक्यात
नवी मुंबईच्या खारघर टेकडीवर बिबट्याचा मुक्त वावर….
चाफेवाडी पाडाजवळ पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची घटना ….
ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

