Dada Bhuse | Lokshahi Marathi Sanwad 2025 : "राज्याचे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न"
लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज "उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आणि दीपक बिल्डर अॅंड डेवलपर्स प्रस्तुत या कार्यक्रमाला आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांची ध्येयधोरणे काय असतील? यावर सविस्तर माहिती या कार्यक्रमात मांडली जाणार आहे. तसेच महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली आणि छगन भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांना शिक्षण क्षेत्रासंदर्भात राज्य सरकारची पुढील दिशा काय असणारं आहे ? प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की,.......
शिक्षणं मंत्री दादा भुसे म्हणाले... , राज्य शैक्षणिक धोरण २०२० या नुसार भविष्याचा शिक्षणाचा वेध घेत असताना आपल्या राज्याचे विद्यार्थी मागे राहूनये भविष्यत जी गुणांक पद्धत येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्या दृष्टीकोनातून त्रिभाषा सुत्र काढण्याची योजना होती. त्यावर जे काहीबी विचार विनिमय झाले त्यावर मला चर्चा करायची नाही. परंतु यानंतर या संदर्भात ज्या काही क्रिया प्रतिक्रिया आल्या त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशाने डॉ जाधव यांची समिती याकरीत गठीत करण्यात आली आहे. या समितीला विरोध होत आहे परंतु लोकशाही असल्यामूळे अशा गोष्टी घडतं असतात ज्याला त्याला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे.
परंतु डॉ जाधव यांबद्दल देशाला माहिती आहे. ते अतिशय वरिष्ठ विचारवंत आहेत. त्यांना अनेक क्षेत्रांचा तसेच शिक्षण क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. देश पातळीवर त्यांनी आपल्या देशाची देखील सेवा केली आहे आणि त्यासोबत राज्यव्यापी संवाद साधून ते जो काही अहवाल येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात राज्य सरकारकडे देणार आहेत, त्यावर चर्चा करून सरकार पुढची दिशा ठरवणार आहे.