Stock Market Update : इराण-इस्रायल युद्ध थांबलं अन् शेअर मार्केट वधारलं! सेन्सेक्ससह निफ्टीने केला विक्रम

Stock Market Update : इराण-इस्रायल युद्ध थांबलं अन् शेअर मार्केट वधारलं! सेन्सेक्ससह निफ्टीने केला विक्रम

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबल्याबरोबर शेअर मार्केट वधारलेल पाहायला मिळत आहे. देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये जून महिन्याचा शेवट वाढीसह झाला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

नुकतचं इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धाला पुर्णविराम लागलं आहे. यांच्यातील युद्धामुळे दोन्ही देशांच मोठ नुकसान झालंच आहे, त्याचसोबत याचा परिणाम शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकदारांना देखील भोगावा लागला आहे. मात्र आता इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबल्याबरोबर शेअर मार्केट वधारलेल पाहायला मिळत आहे. त्याचसोबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी नाटो शिखर परिषदेत अशी माहिती दिली की, पुढच्या आठवड्यात इराणसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान या युद्धविरामाचा फायदा शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये जून महिन्याचा शेवट वाढीसह झाला आहे. यावेळी सेन्सेक्स 1,000 अंकांनी वाढून 83,755 वर बंद झाला असून, तर निफ्टी 304 अंकांनी वाढून 25,549 वर बंद झाला. त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी एक- एक टक्क्यांच्या वाढीसह वर आलेले पहायला मिळाले. त्याचसोबत बँक निफ्टी 585 अंकांनी वाढून 57,206 वर बंद झाला असून बँक निफ्टीने उसळी गाठली आहे.

यावेळी एचडीएफसी बँक 1.78 टक्के, एयू स्मॉल फायनान्स बँक 1.56 टक्के आणि अ‍ॅक्सिस बँक 1.43 टक्क्यांनी वाढले आहे. तसेच अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, भारती एअरटेल, बजाज फायनान्स आणि एटर्नल या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. तर दुसरीकडे टेक महिंद्रा, ट्रेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि मारुती सुझुकी यांचे शेअर्स आपटले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com