Tejas Fighter Plane : मोठी बातमी! 'तेजस' लवकरच वायुदलाच्या ताफ्यात

भारतीय लष्कराच्या गरजेनुसार नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ची स्थापना करण्यात आलेली आहे. तेजस हे लढाऊ विमान भारतीय वायुदलात समाविष्ट होण्यासाठी सज्ज झाले आहे.
Published by :
Team Lokshahi

भारतीय लष्कराच्या गरजेनुसार नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ची स्थापना करण्यात आलेली आहे. तेजस हे लढाऊ विमान भारतीय वायुदलात समाविष्ट होण्यासाठी सज्ज झालेले असून येत्या शुक्रवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.

नाशिकच्या ओझरमध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हा महत्वाचा कारखाना असून यापूर्वी मिग या लढाऊ विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. याच कारखान्यात लष्करी सुखोई, एमकेआय 30 या सुखोई या सुमारे तीनशे लढावू विमानांची निर्मिती करण्यात आली आहे.

सध्या याच सुखोई विमानाच्या देखभाल दुरुस्तीचे काम देखील एचएएलमध्ये सुरू असतानाच संरक्षण खात्याने तेजस या लढावू विमानांच्या बांधणीचे कामदेखील दिले आहे. तेजस मध्ये दीडशे कोटी रुपये खर्च करून एम 1 ए या लढाऊ विमानांसाठी 2023 प्रॉडक्शन लाइन टाकण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com