ताज्या बातम्या
Bacchu Kadu Protest : सहा वाजले, कोर्टाची मुदत संपली! बच्चू कडूंची भूमिका काय?
कोर्टाने दिलेली वेळ संपली असून अजून देखील आंदोलक आंदोलन स्थळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे बच्चू कडू यावर आता काय भूमिका घेणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला 12 वाजल्यानंतर बच्चू कडूंचा रेल रोकोचा इशारा दिला होता. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हटणार नाही, असं म्हणत 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता.
मात्र त्यानंतर बच्चू कडू यांनी सरकारविरोधात केलेलं शेतकऱ्यांसाठीच आंदोलन तीव्र होत गेलं. यामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा बच्चू कडू यांना महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आला होता.
ज्यात आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे हायकोर्टाचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले होते. कोर्टाने दिलेली वेळ संपली असून अजून देखील आंदोलक आंदोलन स्थळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे बच्चू कडू यावर आता काय भूमिका घेणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

