Maharashtra Municipal Election : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले; ‘या’ दिवशी होणार मतदान

Maharashtra Municipal Election : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले; ‘या’ दिवशी होणार मतदान

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील प्रलंबित २९ महापालिकानिवडणुकांची घोषणा केली आहे. महापालिका निवडणुका २९ जानेवारी पूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील प्रलंबित २९ महापालिकानिवडणुकांची घोषणा केली आहे. महापालिका निवडणुका २९ जानेवारी पूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आजची पत्रकार परिषद ही महापालिका निवडणुकांसाठी होती. २ हजार ७८९ जागांसाठी निवडणुका होत आहेत. आजपासून आचारसंहिता लागू करण्यात येत आहे. राज्यातील महापालिका निवडणुका येत्या २३ डिसेबंर ते ३० डिसेंबर नामनिर्देशन पत्र

छाननी ३१ डिसेंबर

उमेदवारी माघर २ जानेवारी २०२६

चिन्हवाटप अंतिम उमेदवार यागी ३ जानेवारी

मतदानाची तारीख १५ जानेवारी २०६

मतमोजणी १६ जानेवारी २०२६

महाराष्ट्रातील प्रस्तावित 29 महापालिका निवडणुका राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी खालील 29 महानगरपालिकांचा समावेश आहे— अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भिवंडी-निजामपूर, बृहन्मुंबई, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मीरा-भाईंदर, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, नवी मुंबई, पनवेल, परभणी, पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर आणि वसई-विरार.

आयोगाने आगामी निवडणुकांसाठी व्यापक तयारी सुरू केली आहे. राज्यातील २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नियोजन आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय आणि तांत्रिक दोन्ही बाजूंनी तयारी तीव्र करण्यात आली आहे.

संभाव्य दुबार मतदार

या निवडणुकीसाठी मतदार यादीतील संभाव्य दुबारमतदारांची  नावे वगळण्यात आली आहेत.  घरी जाऊन  या मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे.  कोणत्याही मतदाराला त्याच्या मतदार संघाशिवाय दुसऱ्या मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदान करू दिले जाणार नाही. मुंबईत  ११ लाख संभाव्य दुबार मतदार होते.  काही  ठिकाणी महापालिकांमध्ये संभाव्य दुबार मतदारांची संख्या अधिक होती.  संभाव्य दुबार मतदारांसमोर डबल स्टार करण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com