UPSC च्या विद्यार्थींसाठी मोठी बातमी! पूर्व परीक्षेनंतरच उत्तर कळी जाहीर होणार
UPSC च्या विद्यार्थींसाठी मोठी बातमी! पूर्व परीक्षेनंतरच उत्तर कळी जाहीर होणार; काय बदल जाणून घ्या... UPSC च्या विद्यार्थींसाठी मोठी बातमी! पूर्व परीक्षेनंतरच उत्तर कळी जाहीर होणार; काय बदल जाणून घ्या...

UPSC च्या विद्यार्थींसाठी मोठी बातमी! पूर्व परीक्षेनंतरच उत्तर कळी जाहीर होणार; काय बदल जाणून घ्या...

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) महत्त्वाचा बदल करत नागरी सेवा पूर्व परीक्षेनंतर लगेच उत्तरांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) महत्त्वाचा बदल करत नागरी सेवा पूर्व परीक्षेनंतर लगेच उत्तरांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही यादी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच समोर येत होती, ज्यामुळे परीक्षार्थींना बरीच प्रतीक्षा करावी लागत होती. ही पायाभूत सुधारणा सर्वोच्च न्यायालयात दाखल एका याचिकेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. न्यायालयाने नियुक्त केलेल्या अमिकस क्युरी यांनी परीक्षा झाल्यानंतर लगेच उत्तरतालिका जाहीर करण्याची सूचना दिली होती.

याआधी आयोगाने ही पद्धत अवलंबल्यास गोंधळ आणि उशीर होऊ शकतो, असं नमूद केलं होतं. मात्र, नंतरच्या प्रतिज्ञापत्रात आयोगाने या सूचनेवर गांभीर्याने विचार करून हा बदल स्वीकारला आहे.

उमेदवारांना आक्षेप नोंदवता येणार

पूर्व परीक्षेनंतर जाहीर होणाऱ्या या तात्पुरत्या उत्तरयादीवर विद्यार्थ्यांकडून प्रतिक्रिया मागवण्यात येतील. नंतर सर्व मुद्द्यांचा विचार करून अंतिम उत्तरयादी ठरवली जाईल आणि तीच निकालासाठी वापरली जाईल. आयोगाने हे बदल शक्य तितक्या लवकर लागू करण्याचे संकेत दिले आहेत.

याचिकेचा मुद्दा काय?

याचिकेत नमूद केलं आहे की, उत्तरयादी, गुण आणि कट-ऑफ लगेच जाहीर केल्यास पारदर्शकता वाढेल आणि उमेदवारांना चुकीच्या मूल्यांकनाविरोधात योग्य पद्धतीने आक्षेप नोंदवता येईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com