केडीएमसीतील बीएसयूपी योजनेतील घरे मिळणारा मार्ग मोकळा,अडीच महिन्यात मिळणार घरे - श्रीकांत शिंदे यांची माहिती
Team Lokshahi

केडीएमसीतील बीएसयूपी योजनेतील घरे मिळणारा मार्ग मोकळा,अडीच महिन्यात मिळणार घरे - श्रीकांत शिंदे यांची माहिती

राज्य सरकारने केले 560 कोटी रुपये माफ
Published by :
shweta walge

अमजद खान,कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी घरकूल योजने अंतर्गत सात हजार घरे उभारली आहे. मात्र लाभार्थ्यानां घरे मिळालेली नाही. प्रत्येक घरामागे 17 लाख रुपये सरकारकडे भरावे लागत होते. बीएसयूपी योजने अंतर्गत सुमारे साडे चार हजार घरे आहे. त्याप्रमाणे एकूण 560 कोटी रुपये राज्य सरकारने माफ केले आहेत. येत्या अडीच महिन्यात लाभार्थ्यानां मोफत घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज दिली आहे.

महापालिका स्थायी समिती सभागृहात आज खासदार शिंदे यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह अधिकाऱ्याचीं बैठक घेतली. या बैठकीस शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे दीपेश म्हात्रे, मल्लेश शेट्टी,राजेश मोरे, रवी पाटील, कैलास शिंदे, मयूर पाटील उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आदी पदाधिकारी उपस्थिती होते. या प्रसंगी खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएसयूपीच्या हिश्याची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. बीएसयूपी योजने अंतर्गत सात हजार घरे बांधण्यात आलेली आहे. त्यापैकी जवळपास 2 हजार घरांचे वाटप करण्यात आलेले आहे. पाच हजार घरांचे वाटप करणे अद्याप बाकी आहे. या घरांच्या बदल्यात प्रत्येक घरामागे 17 लाख रुपये भरावे लागत होते. ही रक्कम माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही घरे सुस्थितीत करुन येत्या अडीच महिन्यात या घरांचे वाटप लाभार्थ्यानां करण्यात येणार आहे. लाभाथ्र्याना घरे मोफत मिळणार आहे.

त्याचबरोबर डोंबिवलीतील बीएसयूपी योजनेतील अपात्र असलेल्या लाभार्थ्यानां क्लस्टरचा लाभ होऊ शकतो. त्यापैकी अत्यंत निकड असलेल्या 90 लाभार्थ्यानां डोंबिवलीतील इंदिरानगरात तात्परुती सशर्त घरे देण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

केडीएमसीतील बीएसयूपी योजनेतील घरे मिळणारा मार्ग मोकळा,अडीच महिन्यात मिळणार घरे - श्रीकांत शिंदे यांची माहिती
ठाकरेंना धक्का तर शिंदेंना 'सुप्रीम' दिलासा! निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती नाही
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com