Indian Railway Mega Job Vacancy
Indian Railway Mega Job VacancyIndian Railway Mega Job Vacancy

Indian Railway Mega Job Vacancy : तुम्ही 10 वी पास आहात, मग ही माहिती तुमच्यासाठी, भारतीय रेल्वेत 22 हजार पदांसाठी भरती

दहावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत आरआरबी ग्रुप ‘डी’ भरती 2026 साठी 22 हजार पदे रिक्त आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Indian Railway Mega Job Vacancy : दहावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत आरआरबी ग्रुप ‘डी’ भरती 2026 साठी 22 हजार पदे रिक्त आहेत. रेल्वे बोर्डाने यासाठी केंद्रीय रोजगार अधिसूचना (CEN) जाहीर करण्यास मंजुरी दिली आहे, आणि ही अधिसूचना डिसेंबर 2025 च्या चौथ्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

रेल्वे भरती मंडळ (RRB) या भरतीला देशभरातील विविध रेल्वे विभाग आणि उत्पादन युनिट्ससाठी राबवणार आहे. रेल्वे बोर्डाने या 22 हजार पदांना मंजुरी दिली आहे. यामुळे रेल्वे ग्रुप ‘डी’ भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हे एक उत्तम संधी ठरणार आहे.

या भरतीमध्ये सर्वाधिक 11 हजार पदे ट्रॅक मेंटेनर ग्रेड–IV पदासाठी आहेत. याशिवाय, असिस्टंट (ट्रॅक मशीन) 600 , असिस्टंट (ब्रिज) 600 , असिस्टंट (पी-वे) 300, असिस्टंट (टीआरडी) 800, असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल) 200 , असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल) 500, असिस्टंट (टीएल अँड एसी) 500 , असिस्टंट (सी अँड डब्ल्यू) 1,000, पॉईंट्समन-बी 5,000 आणि असिस्टंट (एस अँड टी) 1,500पदे आहेत.

पात्रतेसाठी, उमेदवारांचे वय साधारणतः 18 ते 36 वर्षांच्या दरम्यान असावे लागेल. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता म्हणून, उमेदवारांनी दहावी (मॅट्रिक) उत्तीर्ण किंवा आयटीआय प्रमाणपत्र घेतलेले असावे. त्याचबरोबर, संबंधित पदासाठी आवश्यक वैद्यकीय निकष देखील पूर्ण करणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रियेत तीन महत्त्वाचे टप्पे असतील. पहिले म्हणजे संगणक आधारित लेखी परीक्षा (CBT), नंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी. लेखी परीक्षेत सामान्य विज्ञान, गणित, सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती, तसेच सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जाणार आहेत, आणि परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा असेल.

आरआरबी ग्रुप ‘डी’ भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतर, उमेदवार संबंधित प्रादेशिक आरआरबीच्या वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतील. मोठ्या स्पर्धेचा विचार करत, इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू करावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. ही भरती दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक मोठी आणि उत्तम संधी आहे, जी स्थिर आणि सुरक्षित नोकरी मिळवण्याचा एक चांगला मार्ग ठरेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com