Dhule : Big Breaking सावधान!!; दूध की विष, तुम्हीही पिताय का? रबर असलेले दूध, नेमकं प्रकरण काय?
सणासुदीला तुम्हीही पिताय का? रबर असलेलं दूध, आता तुम्ही विचार करत असाल हा प्रश्न कसा विचारला तर, अशी एक धक्कादायक घटना धुळ्याच्या शिरपूरमध्ये घडलेली आहे,
धुळ्याच्या शिरपूर शहर परिसरात असलेल्या करवंद या ठिकाणी राहणाऱ्या लक्ष्मी सुभाष यांनी कुंभार टेक परिसरात जमजम दूध डेअरीमधून लक्ष्मीपूजन दिनानिमित्त दूध आणले होते. ते दूध तापवल्यावर जे काही समोर आले, ते ऐकून धक्का बसला. चक्क दूध रबरासारखे झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रार केली असता FDAअधिकारी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीच सणासुदीच्या काळामध्ये खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे प्रकार समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी धुळ्यातून भेसळ युक्त पनीर आढळून आल्याचे समोर आले होते. दरम्यान सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळखोरांवर करडी नजर ठेवण्याची अपेक्षा असते.

