Ajit Pawar Death
Ajit Pawar Death

Ajit Pawar Death : नियतीच्या घडळ्याची वेळ चुकली, दादा हरपले, बारामती बंद

बारामतीत आज शोकाकुल वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच शहरात शांतता पसरली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

बारामतीत आज शोकाकुल वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच शहरात शांतता पसरली. लोकांनी आपोआप दुकाने बंद ठेवली असून रस्ते ओस पडले आहेत. आपल्या नेत्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी कडकडीत बंद पाळला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात समर्थकांची मोठी गर्दी जमली आहे. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आहेत, तर काहीजण घोषणांतून भावना व्यक्त करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

या घटनेचा परिणाम पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातही दिसत आहे. विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या नेत्याच्या जाण्याने कार्यकर्ते आणि नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरूनही श्रद्धांजलीचे संदेश येत असून प्रशासनाने सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

थोडक्यात

  1. बारामतीत आज शोकाकुल वातावरण निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं.

  2. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची अफवा पसरल्यानंतर शहरात शांतता पसरली.

  3. अनेक नागरिकांनी आपोआप दुकाने बंद ठेवली.

  4. रस्ते ओस पडल्याचं दृश्य पाहायला मिळालं.

  5. आपल्या नेत्याबद्दल आदर व्यक्त करण्याच्या भावनेतून काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com