Gold Rate : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात घसरण, जाणून घ्या काय आहेत दर?
गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात सतत घट झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी सोने खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी असून त्या संधीचा फायदा नागरिकांनी घायलाच हवा. सोन्याच्या भावामध्ये मागील आठवड्याभरातील ही लक्षणीय घट असून त्यामुळे सोनं खरेदीसाठी ग्राहकांची सोन्याच्या दुकानाबाहेर रांगच रांग लागणार असे चित्र आहे.
डॉलरच्या मानाने रुपयाची किंमत, इम्पोर्ट ड्युटी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. काही देशांमध्ये आर्थिक स्थिरता, डॉलरच्या निर्देशांकातील घट, इराण इस्रायलमधील तणावपूर्ण परिस्थिती आणि मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी कमी केल्यामुळे मागणीत घट निर्माण झाली आहे.
याचा फायदा सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना होणार असून सोने खरेदीमध्ये या आठवड्यात वाढ होणार असल्याचे दिसते. त्याचबरोबर सोन्याचे भाव उतरल्यामुळे शेअर मार्केटमध्ये सुद्धा सोन्यामधील गुंतवणूक निश्चितपणे वाढणार आहे. सोन्याच्या किमतीमधील तब्बल 3240 रुपयांची घट मागील आठवडाभरापासून तशीच असल्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 97,500 रुपये असून 22 कॅरेट सोने 89,300 रुपये आहे. तर चांदी 1,07,700 रुपये प्रतिकिलो आहे.