ताज्या बातम्या
Pune Marathi Bank : अभिजात दर्जा मिळूनही माय मराठीला दुय्यम स्थान, पुण्यात ATM मध्ये मराठी भाषाच नाही
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळूनही पुण्यातील बँकेत दुय्यम स्थान, मनसेने मराठी भाषेच्या वापराची मागणी केली
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला खरा, मात्र अजूनही काही ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम स्थान असलेलं पाहायला मिळत आहे. पुण्यातील कोथरूड भागात असलेल्या एका बँकेत मराठी भाषेचा वापर कमी असल्याचं पाहायला मिळाले. तसेच या बँकेच्या एटीएममध्ये मराठी भाषाच नसल्याचे समोर आलं आहे. या विरोधात मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली असून बँक मॅनेजरला निवेदन दिले आहे, आणि मराठी भाषा वापरा अशी मागणी केली आहे