Devendra Fadnavis : 'फलटणमधील डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणाचे राजकारण नको!' फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis : 'फलटणमधील डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणाचे राजकारण नको!' फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणाचे राजकारण करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. रणजित नाईक निंबाळकर यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणाचे राजकारण करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. रणजित नाईक निंबाळकर यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपास पूर्ण झाला असून, आरोपींना कठोर शिक्षा होईल असे फडणवीस म्हणाले.

आपला भर विकासाच्या कार्यक्रमावर असल्याचे सांगत, टीका करण्याची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले. सकारात्मक मत मिळवण्यावर त्यांचा भर आहे. दरम्यान, रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी या प्रकरणातील राजकारणाला ‘गलिच्छ’ संबोधत फलटणला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती होत असून, नांदेडमध्ये पहिली फेरी पार पडली आहे. उमेदवारालाच जागा वाटपाबाबत निवडून येण्याची शक्यता असलेल्या तिकीट दिले पाहिजे अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. कोणतीही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसशी अद्याप झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com