Donald Trump : पॉर्न स्टारला पैसे दिल्याचं प्रकरण भोवलं; अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक
Admin

Donald Trump : पॉर्न स्टारला पैसे दिल्याचं प्रकरण भोवलं; अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या ३० पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांचं अफेअर असल्याचाही आरोप आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी १ लाख ३० हजार डॉलर्स दिल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.

ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी स्टॉर्मी डॅनियलला १ लाख ३० हजार डॉलर एवढी रक्कम देण्यात आली. असा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तसेच २०१६ च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवर केल्याचा ठपका डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला आहे.एखाद्या प्रकरणात अटक झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com