पुण्यात वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे मॅपिंग होणार

पुण्यात वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे मॅपिंग होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्यात वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे मॅपिंग होणार आहे. पुणे पोलिस आयुक्तांकडून मॅपिंगचे आदेश देण्यात आले आहे. येरवडा, मुंढवा यासह काही भागात मागील काही दिवसात वाहन तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत.

तोडफोडीच्या घटनेतील आरोपींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे 'मॅपिंग' करा, असे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com