CM Devendra Fadnavis : औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण, फडणवीसांचं वक्तव्य
राज्यभरात सर्वत्र औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. अस बजरंग दलाकडून अनेक ठिकाणी या संदर्भात आंदोलन करण्यात येत आहेत. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरी बाबत महत्त्वाच वक्तव्य केल आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या देशामध्ये महिमा मंडळ होईल तर ते फक्त छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचा होणार नाही".
"दुर्दैव आहे की, 50 वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षित स्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावं लागत आहे. पण मी एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडळ प्रयत्न केला, तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचा काम केल्या शिवाय राहणार नाही. हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो".