गुजरातमधील अहमदाबाद शहरात नुकताच एक भीषण विमान अपघात घडला आहे. या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि एकूण 242 प्रवासी होते. या घटनेने पुन्हा एकदा देशातील काही अत्यंत धोकादायक रनवे Runway आणि विमानतळांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. भारतात काही विमानतळ असे आहेत, जिथे विमान चालवणं म्हणजे पायलट Pilot साठी एक प्रकारचा कस लागणारा अनुभव असतो. कमी लांबीचे रनवे, डोंगराळ किंवा समुद्रसपाटीवर असलेली भौगोलिक स्थिती आणि हवामानातील बदल यामुळे ही ठिकाणं अत्यंत आव्हानात्मक बनतात. चला, आता पाहूया भारतातील पाच सर्वात धोकादायक आणि लहान रनवे कोणते आहेत.
मेघालयातील बाल्जेक विमानतळाची रनवे लांबी केवळ 3,300 फूट आहे. हे विमानतळ छोट्या विमानांसाठी तयार करण्यात आला असून, सध्या कार्यरत नाही. तरीसुद्धा, निसर्गरम्य परंतु आव्हानात्मक परिसरामुळे हे एक धोकादायक स्थान मानले जाते.
हिमालयाच्या कुशीत असलेले हे विमानतळ पर्यटनासाठी महत्त्वाचे असले तरी त्याचा रनवे डोंगरांमध्ये आहे. लँडिंगसाठी पायलटला अत्यंत अचूक नियंत्रण ठेवावे लागते. 3,691 फूट रनवे असलेल्या या ठिकाणी हवामानही मोठा अडथळा ठरतो.
थंडी, धुके आणि कमी दृश्यमानता शिमल्याजवळ असलेल्या या विमानतळावर अशा अनेक अडचणी उभ्या राहतात. रनवे छोटा असल्यामुळे आणि हवामान सैरभैर असल्यानं इथे विमान उडवणं खूप धाडसाचं काम आहे.
समुद्रकिनाऱ्यावर असलेला हा छोटा विमानतळ लक्षद्वीप बेटांना मुख्य भूमीशी जोडतो. येथे केवळ 4,235 फूट लांबीचा रनवे असून, वाऱ्याचा वेग, ओहोटी-पानतीसारखे समुद्री बदल आणि मर्यादित जागेमुळे पायलटला प्रत्येक उड्डाणात प्रचंड काळजी घ्यावी लागते.
ब्रिटीश काळात लष्करी वापरासाठी उभारलेले हे विमानतळ आजही काही ठराविक उड्डाणांसाठी वापरले जाते. मात्र जुनी पायाभूत सुविधा, अपूर्ण व्यवस्थापन आणि छोटा रनवे हे या विमानतळाचे मोठे धोके आहेत.