महाकुंभ हिंदू धर्मातील पवित्र धार्मिक उत्सव आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील तीर्थक्षेत्रावर 13 जानेवारीपासून या सोहळ्याची शाही थाटात सुरुवात झाली. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवापैकी हा एक उत्सव असल्याच म्हटलं जात. या महाकुंभमेळ्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांसह अभिनेत्यांनी सहभाग घेतला आहे.
प्रविण तरडे
या महाकुंभमेळ्यात नेत्यांसह अभिनेत्यांचा देखील सहभाग पाहायला मिळत आहे. त्यामधील एक म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडे हा कुंभमेळ्यामध्ये सामील झाला आहे. शाहीस्नानाचा व्हिडिओ अधिकृत सोशलमिडियावर पोस्ट करत त्यांने चाहत्यांना माहिती दिली आहे.
महाभारत फेम सौरभ राज जैन
सौरभ जैनने 'महाभारत' मालिकेत श्री कृष्णाची भूमिका साकरली होती. त्या भूमिकेमुळे सौरभ राज घरा घरात जाऊन पोहचला आहे. सौरभ राज जैन महाकुंभमेळ्यात सहभागी झाला होता. सौरभने कुंटुबासोबत प्रयागराजच्या संगमेश्वरमध्ये पवित्र स्नान केल्याचे फोटो सोशलमीडियावर पोस्ट केले आहेत.
अनुपम खैर
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले आहे. अनुपम खेर यांनी प्रयागराज गंगेमध्ये स्नान करतानाची पोस्ट अधिकृत सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अनुपम खेर असे लिहीतात की, "महाकुंभात गंगेत स्नान करून जीवन सफल झाले आहे. गंगा, जमुना आणि सरस्वती माता जिथे पहिल्यांदा भेटतात तिथे पोहोचलो. प्रार्थना करताना डोळ्यांतून अश्रू वाहू लागले हा योगायोग बघा बरोबर एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठादिनी असाच प्रकार घडला होता सनातन धर्माचा विजय'', असंही त्यांनी लिहिले आहे.
रेमो डिसोजा
या महाकुंभमेळ्यामध्ये अनेक कलाकरांनी सहभाग घेतला आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसोजा यांने शनिवारी प्रयागराज कुंभमेळ्यात सहभाग घेतला. त्यांने सोशल मिडियावर पोस्ट टाकत याची माहिती दिली आहे. रेमोने पत्नी लिझेल आणि त्यांची दोन मुलं, यांच्यासोबत प्रयागराजमध्ये स्नान केल्यानंतर बोटीतून प्रवास केला.
मिलिंद सोमन
मॉडेल-अॅक्टर मिलिंद सोमनने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. मौनी अमावस्येला पवित्र स्नान केल्याची माहिती मिलिंद सोमनने दिली आहे.
सुनील ग्रोव्हर
या महाकुंभमेळ्यामध्ये अनेक कलाकरांनी सहभाग घेतला आहे. कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवर यानेही प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सहभाग घेऊन शाही स्नानाचा आनंद घेतला आहे.
द ग्रेट खली
WWE रेसलर 'द ग्रेट खली'ने गुरुवारी प्रयागराज येथील संगममध्ये पवित्र स्नान घेत महाकुंभ मेळ्यात भाग घेतला. इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये खलीसोबत त्यांचे सहकारी देखील दिसले.