नार्वेकरांकडून अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, किशोरी पेडणेकर म्हणाल्या...
उद्धव ठाकरे गटातील मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावरुन राजकीय वर्तुळात गोंधळ सुरु आहे. यावरुन शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, नार्वेकर यांची ही कृती बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कृतीतूनच झाली आहे. शुभेच्छा देणं ही आपली राजकीय संस्कृती आहे. मीसुद्धा अमित शहांना शुभेच्छा देते, असं वक्तव्य केलं आहे.
मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. शिंदे गटाला आता काही काम राहिलेलं नाही, त्यामुळे हा नाराज, तो महाराज… अशा अफवा ते पसरवत असतात, असं वक्तव्य पेडणेकर यांनी केलं आहे.
सध्याचा राजकीय वातावरणावरुन किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ही धुळवड होळी मध्येच होती पण या राजकारणाचे इतके अधःपतन होईल असं वाटलं नव्हतं आता या राजकारणाला आदित्य ठाकरे त्यांच्या चांगल्या वागणुकीने छेद देतील असा विश्वास पेडणेकरांनी व्यक्त केला आहे.