Raj Thackeray   : ...हा मतदारांचा अपमान, राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

Raj Thackeray : ...हा मतदारांचा अपमान, राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

गोरेगाव नेस्को ग्राऊंडवर मनसेचा ग्रॅंड मेळावा आहे. या मेळाव्यात राज्यातील सर्व पदाधिकारी पोहोचले आहेत. मनसेच्या मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख, उपशाखाध्यक्ष तसेच मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी आयोजित हा मेळावा आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • गोरेगाव नेस्को ग्राऊंडवर मनसेचा ग्रॅंड मेळावा

  • मेळाव्यात राज्यातील सर्व पदाधिकारी पोहोचले

  • राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

गोरेगाव नेस्को ग्राऊंडवर मनसेचा ग्रॅंड मेळावा आहे. या मेळाव्यात राज्यातील सर्व पदाधिकारी पोहोचले आहेत. मनसेच्या मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख, उपशाखाध्यक्ष तसेच मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी आयोजित हा मेळावा आहे. राज ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना म्हटले की, विधानसभेत 232 आमदार या निवडणूकीत निवडून आले. इतके मोठे आमदार निवडून आल्यानंतरही राज्यात सन्नाटा होता. मतदार आवाक झाले होते तर निवडून आलेलेही आवाक झाले होते. यामुळे लोकांना कळाले की, देशात निवडणुका कशा झाल्या. अनेक जण बोलतात की, राज ठाकरेंच्या सभेंना गर्दी असते. मतदान नाही पडत.

पुढे बोलताना राज ठाकरेंनी म्हटले की, 1 जुलैला त्यांनी यादी बंद करून टाकली. 96 लाख खोटे मतदार त्यांनी यादीत भरले आहेत. मुंबई, पुणे गावागावात. अशा निवडणुका आपल्याकडे होत आहेत. अशाप्रकारच्या निवडणुका राज्यात होत असतील तर हा राज्यातील जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे. मॅच फिक्सिंग झालेले आहे, तुम्ही मतदान द्या किंवा नको. मग सांगतात की, यांचा एक आमदार निवडून आला नाही एक खासदार निवडून आला नाही. अरे कसा येणार तुम्ही अगोदरच फिक्स करून ठेवलंय.

आम्ही निवडणूक आयोगाला बोलत आहोत तर सत्ताधाकाऱ्यांना राग येतोय, कारण त्यांनी शेण खाल्लंय, असे राज ठाकरेंनी म्हटले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ देखील यावेळी राज ठाकरे यांनी दाखवला आहे. यावेळी नरेंद्र मोदी हे निवडणूक आयोगाबद्दल बोलताना दिसत आहेत. शहरात गावागावत बोगस मतदान होत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी विरोधा पक्षाच्या शिष्टमंडळासोबत निवडणूक आयोगाची भेट घेतली.

राज ठाकरे यांनी अत्यंत गंभीर आरोप करत थेट म्हटले की, 96 लाख खोटे मतदार त्यांनी यादीत टाकली आहेत, आता त्यावरून राज कारण तापताना दिसणार हे स्पष्ट आहे. आम्ही निवडणूक आयोगाला सांगतोय की, निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षांचा गुलाम नाहीये. भुमरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले होते की, त्यांनी बाहेरून 20 हजार मतदान आणले. बेधड सत्ताधारी पक्षातील आमदार तुमच्या नाकावर टिच्चून बोलत आहात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com