Weather Monsoon Updates : यंदा वेळेआधीच पावसाच्या सरी! जाणून घ्या कुठे होणार पावसाचं पहिलं आगमन
संपुर्ण देशभरात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा लोकांवर पडत आहे. महाराष्ट्रातील तापमान जवळपास एप्रिल आणि मे या दोन महिन्यात 45 अंश डिग्री सेल्सियसवर पोहोचलं. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने थंडावाचा दिलासा मिळाला. अवकाळी पावसाने लोकांना एवढा दिलासा मिळाला की, आता लोक पावसाळ्याची म्हणजे मान्सूनची वाट पाहत आहेत.
देशभरात शेतकरी हे पावसावर अवलंबून असतात. यंदा हवामान विभागाने अनेकांसाठी दिलासादायक ठरणारा अंदाज लावला आहे. यावेळी मे महिन्याच्या शेवटीच पावसाचे आगमन होणार आहे. यंदा केरळमध्ये पावसाचे ढग लवकर दाखल होणार आहेत. ज्यामुळे शेती हंगाम वेळेवर सुरू होईल. तर सर्वसामान्य नागरिकांनाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.
दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला आगमन करणारा पाऊस यावर्षी 27 मे च्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो. यंदा केरळमध्ये पावसाची सुरुवात झाल्यानंतर 8 जुलैच्या आसपास संपूर्ण देशात पावसाचा वर्षाव सुरु होणार आहे. तसेच सप्टेंबरच्या मध्यापासून वायव्य भारतातून पावसाळा परतणार आहे. पावसाचे आगमन केरळमधून सुरू होऊन उत्तर व पश्चिम दिशेने पसरते.