Control Irritation : छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होतेय; करा 'हे' सोपे उपाय

Control Irritation : छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होतेय; करा 'हे' सोपे उपाय

अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत छोट्या-छोट्या गोष्टींनी वैतागून चिडचिड करत असल्याचे सर्रास पाहायला मिळते.
Published by :
Rashmi Mane
Published on

आजच्या आधुनिक युगात गोष्टी झटपट उपलब्ध होऊ लागल्या आहेत, मात्र लोकांची सहनशक्ती कमी होऊ लागली आहे. अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत छोट्या-छोट्या गोष्टींनी वैतागून चिडचिड करत असल्याचे सर्रास पाहायला मिळते. एकादी गोष्ट मनासारखी मिळाली नाही, एखादी वस्तू हवी तशी हातात आली नाही किंवा एकाद्यावेळी गरजेपेक्षा जास्त उशीर होत असेल तर लगेच चिडचिडीला सुरूवात होते. अशा अवस्थेमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चिडचिड कमी करणे, मेडिटेशन करणे, संजय बाळगणे आवश्यक आहे. काही सोप्या उपायांमुळे आपली चिडचिड कमी करू शकतो.

काही उपयुक्त उपाय

शांत आणि समतोल जीवनशैली : नियमित झोप, संतुलित आहार, आणि नियमित व्यायाम याने तुमची चिडचिड कमी होऊ शकते.

ताण कमी करण्याचे व्यायाम : योग, ध्यान आणि प्राणायाम यांसारख्या व्यायामाद्वारे ताण कमी करता येतो.

सामाजिक संवाद : मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवणे आणि संवाद साधणे. यामुळे मानसिक संतुलन सुधारते.

चिडचिडेपणाचे कारण शोधणे : जर तुम्हाला सतत चिडचिड होत असेल, तर त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. काहीवेळा काही शारीरिक किंवा मानसिक समस्यांमुळे चिडचिड होऊ शकते.

चिडचिडीचे व्यवस्थापन : चिडचिडीची भावना जाणवल्यास शांत होण्यासाठी काही उपाय आहेत, जसे की खोल श्वास घेणे, शांत ठिकाणी बसणे, किंवा शांत संगीत ऐकणे.

तज्ज्ञांची मदत : जर तुम्हाला सतत चिडचिड होत असेल, तर डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य उपचार आणि मार्गदर्शन देऊ शकतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com