भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; 70 लोक दबल्याची भीती

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; 70 लोक दबल्याची भीती

भिंवडीतील वलपाडा येथील एक तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे.
Published by :
shweta walge
Published on

मुंबईत अत्यंत दुखदायक घटना समोर आली आहे. भिंवडीतील वलपाडा येथील एक तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. या घटनेत जिवीत हानी झाली नाही. मात्र इमारतीखाली 60 ते 70 लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भिवंडीतील वलपाडा येथे आज दुपारी वर्धमान नावाची तीन मजली इमारत कोसळली असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 60 ते 7० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशम दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. ही इमारत जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com