तैवानमध्ये २४ तासांत तीन मोठे भूकंप, प्रचंड नुकसान; जपानने दिला त्सुनामीचा इशारा

तैवानमध्ये २४ तासांत तीन मोठे भूकंप, प्रचंड नुकसान; जपानने दिला त्सुनामीचा इशारा

मालमत्तेसोबत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी

नवी दिल्ली : तैवानमध्ये गेल्या २४ तासांत तीन मोठे भूकंप झाले आहेत. ठिकाणी ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे समजत आहे. यामुळे मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. रस्ते, पुलला तडे गेले आहेत. सोबतच जीवितहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या पार्श्वभूमीवर जपानने तैवानला त्सुनामीचा इशाराही जारी केला आहे.

तैवानच्या हवामानशास्त्र तज्ज्ञांनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू आग्नेय दिशेला असलेल्या तैतुंग काउंटीमध्ये होता. याच भागात शनिवारी ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर रविवारी सकाळी ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. व दुपारी या ठिकाणी ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

भूकंपामुळे तैवानमध्ये अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. पूल पडले आहेत. रेल्वेगाड्या रुळावरून घसरल्या. रेल्वे स्थानकाचे छतही कोसळले युली येथील एका दुकानात चार जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भूकंपानंतर यूएस पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने तैवानमध्ये त्सुनामीचा इशारा जारी केला असून 3.2 फूट उंच लाटांचा इशारा दिला आहे.

तैवान रिंग ऑफ फायर क्षेत्रात येतो. हा भाग अशा ठिकाणी आहे जिथे सर्वाधिक भूकंप होतात. व त्सुनामी येते. ज्वालामुखीचा उद्रेक होतो. वास्तविक तैवान दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या अगदी जवळ वसलेले आहे. या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल झाली तर तैवानला भूकंप आणि त्सुनामी या दोन्हींचा धोका आहे. यापूर्वी 2016 मध्ये तैवानमध्ये झालेल्या भूकंपात 100 लोकांचा मृत्यू झाला होता. तर १९९९ मध्ये ७.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे २००० लोकांचा मृत्यू झाला होता.

Lokshahi
www.lokshahi.com