समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुरात तीन जण अडकले; समुद्रपूर पोलीस घटनास्थळी दाखल

समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुरात तीन जण अडकले; समुद्रपूर पोलीस घटनास्थळी दाखल

जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला आलेल्या पुरात तीन जण अडकले आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भूपेश बारंगे | वर्धा: जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला आलेल्या पुरात तीन जण अडकले आहे. तिघांनी पुरात असलेल्या झाडाचा सहारा घेतल्याने तिघेही सुखरूप आहे. तात्काळ समुद्रपुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पुरात अडकलेल्याना बचावासाठी समुद्रपूर पोलीसांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चमूला पाचारण केलं आहे. तिघांना पुरातून काढण्याचा रेस्क्यू पथकाचे शर्यतीचे प्रयत्न सुरू केले आहे. लवकरच तिघांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कारंजा तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने कारंजा ते माणिकवाडा जाणाऱ्या रस्त्यावरील सावरडोह जवळील खडक नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने काही काळापासून रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. तर सेलू तालुक्यातील पहेलानपूर ते दहेगाव (गो.) रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने पहेलानपूर गावाचा संपर्क तुटला आहे. जसापूर ते विखाणी मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्याने विखाणी मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com