Bhiwandi: शॉर्टसर्किटमुळे प्लास्टिक कॅरेटला भीषण आग

Bhiwandi: शॉर्टसर्किटमुळे प्लास्टिक कॅरेटला भीषण आग

भिवंडीतील पिराणी पाडा परिसरात फळांच्या कॅरेटला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून यामध्ये शेजारी असलेल्या तीन मजली इमारतीला
Published by  :
shweta walge

भिवंडीतील पिराणी पाडा परिसरात प्लास्टिक कॅरेटला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून यामध्ये शेजारी असलेल्या तीन मजली इमारतीला देखील आग लागली. यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. एका तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याच समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com