विजेचा धक्का लागल्यानं टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू

विजेचा धक्का लागल्यानं टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू

टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू झाला आहे. संतोष मुंडे या त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जात होता.

टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू झाला आहे. संतोष मुंडे या त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जात होता. त्याचे लाखोंच्या वर फॉलोवर्स आहेत. आपल्या अभिनयानं त्यांनी लाखो प्रेक्षकांना भुरळ पाडली होती.संतोष मुंडे हा फेमस टिकटॉक स्टार होता. त्याच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील भोगलवाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे.संतोष मुंडे आणि बाबुरा मुंडे हे दोघे डीपीचा फ्यूज बदलण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. शेतामध्ये बसून तो कायमच टिकटॉकवर व्हिडीओ तयार करायचा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com