Parliament Winter Session : संसदेच्या अधिवेशनाचा आज चौथा दिवस; आजही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Parliament Winter Session ) संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. 1 डिसेंबरपासून 19 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. आज संसदेच्या अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारने चर्चा आणि मंजुरीसाठी दोन विधेयके सूचिबद्ध केली असून दहा विधेयके पटलावर मांडण्यात येणार आहेत.
हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडणूक आयोगाने 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या एसआयआर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे असले तरी त्यात प्रत्यक्ष कामकाजाचे 15 दिवसच आहेत.
Summery
संसदेच्या अधिवेशनाचा आज चौथा दिवस
आजही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीच
1 डिसेंबरपासून 19 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार
